डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी साडेसात लाख थकबाकी भरली 

राजेनिंबाळकर कुटुंबाकडे आणखी १८ लाख थकबाकी 
 
s
येळगट्टे जोरात , पुढारी कोमात 

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर पालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी चौकाचौकात होर्डिंग्ज लावून जाहीर केली आहे. या होर्डिंग्जवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव देखील होते, पण पालिकेने त्यावर नंतर चिकटपट्टी लावली, त्यामुळे शहरात चर्चेचा विषय झाला होता. 

याबाबत मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांच्याकडे विचारणा केली असता, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर  यांनी साडेसात लाख रुपये थकबाकी भरली आहे. पण आणखी राजेनिंबाळकर कुटुंबाकडे १८ लाख थकबाकी असल्याचे त्यांनी मान्य केले. 

r

होर्डिंग्जवर डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव कसे आले आणि चिकटपट्टी का लावली यावर त्यांनी गुळगुळीत उत्तरे दिली. त्यावर खासदार ओमराजे निंबाळकर चांगलेच भडकले आहेत. आमच्याकडे कसलेली थकबाकी नाही. साडेसात लाख रुपये गतवर्षी भरलेले आहेत. पालिकेच्या  चुकीमुळे आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. 

पण वस्तुस्थिती अशी आहे की, राजेनिंबाळकर कुटुंबाकडे आणखी १८ लाख मागील आणि चालू वर्षाची साडेतीन लाख रुपये थकबाकी आहे. खा. ओमराजे यांचे  थेट नाव नसले तरी त्यांच्या कुटुंबाकडे ही थकबाकी असल्यामुळे त्याची  जोरदार चर्चा सुरु आहे. 

येळगट्टे जोरात , पुढारी कोमात 

उस्मानाबाद नगर पालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांच्याकडेच प्रशासक पदाची सूत्रे हाती आली आहेत. येळगट्टे यांनी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच थकबाकी  वसुली करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. ज्यांच्याकडे मोठी  थकबाकी आहे, त्यांची नावे आणि थकबाकीची  शहरात चौकाचौकात होर्डींज लावून जाहीर केली आहेत, त्यात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव दोन नंबरवर आहे. मात्र त्यावर चिकटपट्टी लावण्यात आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. 

उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे 'अ' दर्जाची नगर पालिका आहे, लोकसंख्या १ लाख २० हजार असून एकूण ३९ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष असे ४० पदाधिकारी होते, आता निवडणूक झाल्यास  २ नगरसेवक वाढणार असून, एकूण ४१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. दरम्यान पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच प्रशासकांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. 

हे आहेत थकबाकीदार 

मावळते  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे बंधू चित्रसेन राजेनिंबाळकर यांच्याकडे ४ लाख ९३ हजार थकबाकी आहे. तसेच जनता बँकेचे माजी चेअरमन ब्रिजलाल मोदाणी  यांच्या पत्नी कांता मोदाणी यांच्याकडे  ६ लाख ८५ हजार , डॉ. दिग्गज दाबके यांच्याकडे ८ लाख ४३ हजार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे यांच्या पत्नी सूचिता गोरे यांच्या नावावर ६ लाख ९९ हजार, पुष्पक मंगल कार्यालयाचे मालक अनिल नाईकवाडी यांच्याकडे ५ लाख ७५ हजार. आशिष मोदाणी यांच्याकडे ४ लाख ४६ हजार, सतीश दंडनाईक यांच्याकडे १६ लाख , दिलीप देशमुख यांच्याकडे १८ लाख थकबाकी थकलेली आहे. 

गोरगरीब लोकांकडून सक्तीने वसुली करणारी नगरपालिका बड्या लोकांकडून थकबाकी वसूल करण्यात कमी पडत असून, प्रशासक येताच पालिकेला जागा आली आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंधूंच्या नावावर चिकटपट्टी  का लावण्यात आली, याचे उत्तर  मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांनी समाधानकारक न दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

d


 

r

r

 

o

 

From around the web