उस्मानाबाद शहरातील मोकाट जनावराचा बंदोस्त करणे बाबत भाजपा आक्रमक !

 
S

उस्मानाबाद  - भारतीय जनता पार्टीवतीने शहरात वावरत असलेले मोकाट जनावरे यामध्ये गाई, म्हशी, कुत्रे, डुकरे गर्दीच्या ठिकाणी वावरत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषदला जाग आणुन देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना  निवेदन देण्यात आले.

 निवेदनात असे नमुद केले की, शहरातील गर्दीच्या ठिकाणी हॉस्पीटल, शाळा, महाविद्यालय, मुख्य वाहतुकीच्या रस्ते यावर मोकाट जनावरांचा वावर शहरात आहे. यामुळे दुर्घंधीचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या जनावरामुळे मुख्य रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोबतच असंख्य रोगाला आमंत्रण या भटक्या व मोकाट जनावरामुळे होत आहे. याला आवर घालण्यासाठी भाजपा धाराशिवच्या वतीने मोकाट जनावरे यात गाई, म्हशी, कुत्रे, डुकरे यांना प्रत्यक्षात नेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शना खाली आंदोलन करण्यात आले.

D

या प्रसंगी सुनिल काकडे (माजी नगराध्यक्ष), राजसिंह राजेनिंबाळकर (जिल्हाध्यक्ष भाजयुमो), पांडुरंग लाटे, शिवाजी पंगुडवाले, राहुल काकडे (शहराध्यक्ष), अभय इंगळे (माजी उप नगराध्यक्ष), अर्चना अंबुरे (जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा), मेसा जानराव, रोहित देशमुख, अमोल राजेनिंबाळकर, अतिक पटेल, सुरज साळुंके, लक्ष्मन माने, प्रविण पाठक, प्रविण सिरसट, ओम नाईकवाडी, संदिप इंगळे, सुनिल पंगुडवाले, हिम्मत भोसले, राज निकम, रमण जाधव, नरेन वाघमारे, रमण जाधव, सुरज शेरकर, विनोद गपाट, विद्या माने, सारिका कांबळे, वर्षा पाटील, संदिप कोकाटे, बालाजी कोरे, प्रकाश तावडे, वैभव हंचाटे, विनोद निंबाळकर, दत्ता मुंडे, पंडित मंजुळे, सागर दंडनाईक, जगदीश जोशी, बप्पा उंबरे, अजीत उंबरे, अर्जुन पवार, अतुल चव्हाण इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

From around the web