बाहेर गेलेल्या चालकांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना

 
बाहेर गेलेल्या चालकांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना


उस्मानाबाद :-  लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थालातंरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी  व इतर व्यक्ती यांना आदेशातील परिशिष्ट अ (annexure A) मध्ये नमूद केलेल्या प्रमाणीत कार्यपध्दतीनुसार (SOP) त्यांचे मूळ रहिवाशाचे ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली असल्यामूळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या इतर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील व्यक्तींना त्यांचे जिल्ह्यात, त्यांचे राज्यात पाठविण्याची कारवाई  करण्यात येत आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील निवारागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या इतर जिल्हयातील, इतर राज्यातील नागरिकांना त्यांचे जिल्हयात, राज्यात पाठविण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक वाहने उपलब्ध करुन या वाहनाव्दारे पाठविण्यात येत आहेत. या नागरिकांना त्यांचे जिल्हयात, राज्यांत सोडल्यानंतर या वाहनाचे चालक परत उस्मानाबाद जिल्हयात येणार आहेत.

त्या अनुषंगाने आदेशातील परिशिष्ट अ (annexure A) मध्ये नमूद केलेल्या प्रमाणीत कार्यपध्दतीनुसार (SOP) इतर जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आवश्यकतेनुसार 14 दिवस सक्तीने संस्थात्मक विलगीकरण (lnstitutional quarantine), घरी अलगीकरण (Home quarantine) करणेबाबत सूचना असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील निवारागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या इतर जिल्ह्यातील, इतर राज्यातील नागरिकांना त्यांचे जिल्ह्यात, राज्यात सोडण्यासाठी जिल्ह्यातील जी स्थानिक वाहने पाठविण्यात आली आहेत. त्यांचे वाहनचालक  त्या जिल्हयातून, राज्यातून परत उस्मानाबाद जिल्हयात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (lnstitutional quarantine) मध्ये ठेवणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करण्यात यावा.

From around the web