डिग्गीच्या महिला सरपंचाचे उपोषण मागे

 
डिग्गीच्या महिला सरपंचाचे उपोषण मागे

उमरगा – उस्मानाबाद लाइव्हच्या बातमीनंतर  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी डिग्गी येथे उपोषण स्थळी  भेट देवून लेखी आश्वासन दिल्यानंतर  महिला सरपंच उर्मिला गायकवाड यांनी आपले उपोषण मागे घेतले. डिग्गीच्या आरोग्य केंद्रास एक आरोग्य अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांची आजपासून नियुक्ती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात सर्व पदे भरण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी  यावेळी दिले.  


यापूर्वीचे वृत्त 
महिला सरपंचाचे उपोषण
एकीकडे जागतिक महिला दिन आज साजरा होत असताना, उस्मानाबाद जिल्ह्यातील डिग्गी गावच्या महिला सरपंचास एका न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे.
उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला २०१५ मध्ये मान्यता मिळाली होती, त्यानंतर दोन कोटी ३७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत दोन वर्षापासून धूळ खात पडून आहे, या प्राथमिक आरोग्य केंद्राला १५ कर्मचाऱ्यांची मान्यता असताना त्याची भरती केली जात नाही, तसेच कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. त्यामुळे सरपंच उर्मिला गायकवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गेल्या तीन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे.
आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जागतिक महिला दिन आहे,तरीही एका महिला सरपंचास न्याय मागणीसाठी उपोषण करण्याची दुर्दवी वेळ आलेली असताना प्रशासन अद्याप ढिम्म आहे.

From around the web