निष्क्रिय गृहमंत्र्यामुळे पोलिसांची बेबंदशाही वाढली

  - ॲड रेवण भोसले
 
Revan Bhosle

उस्मानाबाद - निष्क्रिय गृहमंत्र्यामुळे पोलिसांची बेबंदशाही वाढली आहे, अशी टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

जालना येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरच्या तक्रारीवरून शिवराज नारियलवाले या व्यक्तीस पोलिसांनी लाट्या -काट्यांनी गुरा -ढोरासारखे बेदम मारून पोलीस खात्याची सर्व लक्तरे वेशीला टांगली आहेत. त्याचप्रमाणे राज्यात कोरोना महामारी तही दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचार सुरूच आहेत, लोकांचे खून पडत आहे .त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णालयात रुग्णांवर केलेल्या उपचाराची बिल एवढे कसे झाले असे विचारपूस करण्यास गेलेल्या व्यक्ती वरही पोलीस गुन्हे दाखल करून त्यांना त्रास  देण्याचे काम करत आहेत. 

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे . यास सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री जबाबदार असून ते निष्क्रिय आहेत त्यामुळेच पोलिसांची लोकांना जनावरांप्रमाणे मारण्याची मजल गेली आहे ,म्हणून जालना येथे घडलेल्या घटनेचा जनता दल तीव्र निषेध करत असून येथील जिल्हा पोलीसप्रमुखासह त्या व्यक्तीला लाठ्या-काठ्या आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

From around the web