श्याम टरके यांना पीएच.डी पदवी जाहीर

प्रबंधात उस्मानाबाद लाइव्हचा समावेश
 
श्याम टरके यांना पीएच.डी पदवी जाहीर

औरंगाबाद -  औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहायक श्याम टरके यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पीएच.डी पदवी जाहीर झाली आहे. त्यांचा ‘हिंदी व मराठी वेब वृत्तपत्रांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोध प्रबंध विद्यापीठाने स्वीकारला.या प्रबंधात उस्मानाबाद लाइव्हचा समावेश आहे, हे विशेष.  


माहिती सहायक श्याम टरके यांनी यापूर्वी एमफिल पदवी संपादन केली आहे. पीएच.डी पदवीसाठी त्यांनी हिंदी व मराठी वेब वृत्तपत्रांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोध प्रबंध सादर केला होता.  या प्रबंधात राष्ट्रीय पातळीवरील बीबीसी हिंदी, तहलका हिंदी तर प्रादेशिक स्तरावरील उस्मानाबाद लाइव्ह आणि आज लातूर या वेब वृत्तपत्रांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. 

टरके यांना  मार्गदर्शक म्हणून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर डॉ. सुधीर गव्हाणे व सहमार्गदर्शक म्हणून नांदेड विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक तथा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा जनसंपर्क तज्ज्ञ व हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री सुरेश पुरी यांनी अभिनंदन केले आहे.

 श्री. टरके यांनी यापूर्वी दै.गोदातीर समाचार, दै.मराठवाडा साथी, दै. सकाळ आणि गोवा येथे दै. पुढारीमध्ये उपसंपादक, बातमीदार म्हणून काम केलेले आहे. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वर्धा जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर संचालक कार्यालय येथे माहिती सहायक पदावरही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते औरंगाबादच्या माहिती केंद्रात माहिती सहायक पदावर कार्यरत आहेत. 

 या प्रबंधासाठी श्याम टरके यांनी, उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांची मुलाखत घेतली होती. ही  मुलाखत नक्की ऐका ... 

From around the web