पंकजा मुंडे नाराज नाहीत - फडणवीस 

 
पंकजा मुंडे नाराज नाहीत - फडणवीस
पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्तीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल... 
 

औरंगाबाद- भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त  फेटाळून लावत ''ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात''  असा टोला  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाला लगावला आहे

औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार बेईमानी करून आलेले सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे नाही तर योग्य वेळी शपथ घेतली जाईल तसेच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असे ते म्हणाले. फडणवीसांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असताना राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केले होते. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असे विधान फडणवीस यांनी केले आहे.

From around the web