मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या संदर्भात केल्या दोन महत्वाच्या घोषणा 

 
s

औरंगाबाद  -  संपूर्ण मराठवाड्यात आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. 

 ‘मराठवाडा निजामाविरोधात ज्या प्रमाणे लढला, तसेच आपण कोरोनाविरोधात लढू’. निजामाच्या खुणा राहणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद संतपीठाची  घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण सुरू करत आहोत. संतांची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी संतपीठ उभारतोय. संतपीठ हे फक्त प्रेक्षणीय स्थळ राहता कामा नये. आज संतपीठ उभारतोय हे संत विद्यापीठ झालं पाहिजे जे जगात इतर कुठेही नसेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा

1.   औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार 

2.   पैठण येथील संतपीठाचे  अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
 
3.   परभणी येथे 200 बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

4.   उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही  वेगाने सुरू

5.   सिथेंटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे

6.   हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी

7.   औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना

8.   औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी 

9.   सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये

10. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून

11. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५०  कोटी रुपये

12. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना जल जीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये

13. उस्मानाबाद शहराची  168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना 

14. औरंगाबाद : १६८० कोटींच्या  पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश 

15. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी

16. औरंगाबाद - शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ

17. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार

18. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार

19. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार

20. मराठवाड्यात येत्या  वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार

21. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश

22. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च 

23. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास . 86.19 कोटी रुपये खर्च येईल. 

24.  नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.

From around the web