नांदेडचा शासकीय कर्मचारी घोड्यावरून येणार !

जिल्हाधिकाऱ्याकडे कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची मागितली परवानगी 
 
नांदेडचा शासकीय कर्मचारी घोड्यावरून येणार !

नांदेड - आजवर शासकीय कर्मचारी दुचाकी किंवा  चार चाकी वाहनातून ऑफिसला येत होते. मात्र नांदेडचा एक शासकीय कर्मचारी चक्क घोड्यावर बसून येणार  असून त्याने जिल्हाधिकाऱ्याकडे कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. 

सतीश पंजाबराव देशमुख असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.  नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी ( रोहयो) पदावर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याने आपणास पाठीच्या मणक्याचा त्रास असून, त्यामुळे टू  व्हीलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे आपण घोड्यावर बसून ऑफिसमध्ये येणार असून, कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. 

 या विनंतीनुसार सतीश देशमुख यांना  नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देणार का ? याकडं लक्ष वेधले आहे. 

सतीश  देशमुख यांनी घोडा बांधण्याची परवानगी मागितलेला विनंती अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


 

From around the web