लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करून डॉ. कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ

 
s

बीड -   केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ केला. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जन आशीर्वाद यात्रेस झेंडा दाखविला. खा. डॉ. प्रीतम मुंडे,  माजी मंत्री आमदार अतुल सावे,  यात्रा प्रमुख मनोज पांगारकर, यात्रा सहप्रमुख प्रवीण घुगे, आ. नमिता मुंदडा, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. रमेश आप्पा कराड, आ.सुरेश धस, आ. मेघना बोर्डीकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, बापू घडामोडे, बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिरीष बोराळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. त्या पूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.       

          जन आशीर्वाद यात्रा गंगाखेड मार्गाने पुढे रवाना झाली. उकडगाव नाक्यावर कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी जन आशीर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत केले. डॉ. कराड यांनी यात्रेदरम्यान अनेकांशी संवाद साधला.  परळी येथे वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर बंद असल्यामुळे डॉ. कराड यांनी मंदिर शिखर दर्शन घेतले व पायऱ्यांचे पूजन केले. त्यापूर्वी डॉ. कराड यांनी श्रीमती प्रज्ञा मुंडे यांचीही भेट घेतली.

From around the web