पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरुवात , रात्री ८ नंतर निकाल 

 
पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरुवात , रात्री ८ नंतर निकाल

औरंगाबाद - औरंगाबाद ( मराठवाडा ) पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीस कलाग्राम, एमआयडीसी, चिकलठाणा येथे सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. ही  निवडणूक मतपत्रिकांवर झाल्याने रात्री उशिरा निकाल जाहीर होणार आहे. 


या निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र चुरशीची लढत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष  बोराळकर यांच्यात झाला. अपक्ष रमेश पोकळे किती मतदान घेतात, यावर बरीच गणिते अवनलंबून आहेत. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 3 लाख 73 हजार 166 पैकी 2 लाख 40 हजार 796 मतदारांनी मतदान केल्यानंतर  आज सकाळपासून मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रात्री आठ नंतरच निकाल येतील असा अंदाज बांधला जातोय. 

मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढली आणि उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन यावेळी 56 टेबलवर मतमोजणी होणार आहे .यासाठी पाच फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांमध्ये वैध मतांची छाननी करून पहिल्या पसंतीच्या मतांची सुरुवातीला मोजणी करण्यात येणार आहे. निवडून येण्यासाठीच्या मतांचा कोटा ठरल्यानंतर प्रथम पसंती क्रमांकावर कोणत्याही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत.


हे आहेत उमेदवार 

1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद.

11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 14) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 15) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 16) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 17) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 18) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 19) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 20) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 21) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.

22) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 23) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 24) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 25) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 26) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 27) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 28) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 29) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 30) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 31) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 32) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 33) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 34) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 35) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.

धुळ्यात भाजपचा विजय
धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी विजय मिळवला आहे. हा महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल 234 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेलांनी विजय मिळवला. त्यांना 332 मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या 98 मतांवर समाधान मानावे लागले आहे.


 

From around the web