मुकबधीर मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या 

 आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी
 
मुकबधीर मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

उस्मानाबाद -  नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील एका तीस वर्षीय मूकबधीर व दिव्यांग मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे  जिल्हाधिकार्‍यांकडे दि.११ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील मातंग समाजातील एका तीस वर्षीय मूकबधीर व दिव्यांग मुलीवर दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन नराधमांनी अन्याय व बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. 

या प्रकरणातील सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी व मुलीला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा. सदरील घटना अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद असून सदरील प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व अशा प्रकारची  घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने  घ्यावी अन्यथा राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावर जिल्हाध्यक्ष अमोल पेठे, पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कांबळे, अक्षय कांबळे, अमित चव्हाण, विकास एडके व धर्मेश पौळ‌ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

From around the web