लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची अकोल्याला बदली
बी.पी. पृथ्वीराज नूतन जिल्हाधिकारी
Tue, 8 Dec 2020

लातूर - लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची अकोला येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी परभणीचे बी.पी. पृथ्वीराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत यांची ओळख होती. त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी परभणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परभणी सीईओ म्हणून औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एस.टी.टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.