लॉकडाऊनमुळे औरंगाबादेत व्हिडिओ कॉलद्वारे निकाह
Sat, 4 Apr 2020
मुस्लिम कुटुंबाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम कसोशीने पाळले
औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना व्हायरस वेगाने पाय पसरत आहे. अशा परिस्थितीत देशामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग ही बरीच चर्चा होत आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान औरंगाबादमध्ये राहणार्या एका मुस्लिम कुटुंबाने ज्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे नियम कसोशीने पाळलेले आहेत ते संपूर्ण समाजासाठी एक उत्तम उदाहरण ठरु शकेल.
औरंगाबादमध्ये नुकतेच एका निकाहचे आयोजन करण्यात आले होते. या सोहोळ्यात जवळपास बरीच माणसे सामील झाली होती. या निकाहचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धार्मिक विधी व्हिडिओ कॉलद्वारे पूर्ण केले गेले. यासह निकाहच्या मेहेरची रक्कम वधू आणि तिच्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉलद्वारेच कळविण्यात आली.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा फारच झपाट्याने वाढत आहे. मीडियाच्या एका रिपोर्टनुसार, मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 600 हून अधिक रुग्ण आढळलेले आहेत आणि आणखी अनेक रूग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा 68 वर पोहोचला आहे.
#WATCH Maharashtra: 'Nikah' of a couple was performed through video call in Aurangabad yesterday amid lockdown due to #Coronavirus pandemic. pic.twitter.com/jHGTOblrAt— ANI (@ANI) April 4, 2020