लातूर जिल्ह्यात १५ दिवस लॉकडाऊन

 
लातूर जिल्ह्यात १५ दिवस लॉकडाऊन


लातूर - लातूर जिल्ह्यात वाढत चाललेला कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता १५ जुलैपासून ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी येथे केली. या संदर्भातील अधिक तपशील लवकरच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.


अनलॉक-२ च्या काळात बऱ्याच व्यवस्था जिल्ह्यात सुरू झाल्या. मात्र या काळात रेड झोनमधून अनेक प्रवासी जिल्ह्यात आले आहेत. परिणामी कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडणे आवश्यक बनले आहे.

 एकंदरीत परिस्थितीचा विचार करता संभाव्य धोका टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात १५ ते ३० जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फेसबुक लाईव्हवर रात्री संवाद साधताना मेडिकल व जीवनावश्यक सेवा चालू राहणार आहेत. मात्र देशी व विदेशी मद्यविक्रीची दुकाने सोमवारपासूनच लॉकडाऊनच्या पूर्ण काळात बंद राहतील, असे ते म्हणाले.

From around the web