भाजपची उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 

 
भाजपची उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर

औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर करण्यात आली आहे. बोराळकर यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

भाजपच्या उमेदवारीसाठी शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, रमेश पोकळे आदी इच्छूक होते. मात्र पक्षश्रेष्ठींने पुन्हा एकदा बोराळकर यांना संधी दिली आहे. मागील  निवडणुकीत बोराळकर यांचा पराभव झाला होता. 

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी दोनदा बाजी मारली आहे. तिसऱ्यांदा ते निवडणुकीत उतरले आहेत. पुन्हा एकदा चव्हाण - बोराळकर सामना रंगणार आहे. 

औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेस माजी मंत्री पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या, त्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमिपुत्र प्रवीण घुगे यांना  उमेदवारी न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. 

१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

उमेदवारांची नावे अशी आहेत 

१)   औरंगाबाद  ( पदवीधर ) -  शिरीष बोराळकर

२)   पुणे ( पदवीधर ) - . संग्राम देशमुख

३)   नागपूर ( पदवीधर) -  संदीप जोशी

४)   अमरावती ( शिक्षक मतदार संघ ) –  नितीन धांडे


 

From around the web