औरंगाबाद: मालगाडीने 19 मजुरांना चिरडले, 16 जागीच ठार, 3 गंभीर

 
 औरंगाबाद: मालगाडीने 19 मजुरांना चिरडले, 16 जागीच ठार, 3 गंभीर

औरंगाबाद- लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने जालन्याच्या एका स्टील कंपनीतील 19 मजूर रेल्वे पकडण्यासाठी पायीच रेल्वेस्थानकाकडे निघाले. रात्र झाल्याने पथारी टाकून रूळावरच झोपले. त्यांना एका मालगाडीने चिरडले. यात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. बदनापूर-करमाड दरम्यान सटाणा शिवारात शुक्रवारी (दि. 5) ही घटना घडली.



पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणार्‍या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. हे सर्व मजूर छत्तीसगडचे आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. अपघातग्रस्त रेल्वे गाडी नांदेडहून मनमाडला पेट्रोल-डिझेल घेऊन निघाली होती, अशी माहिती औरंगाबादचे रेल्वे स्टेशन मॅनेजर अशोक निकम यांनी दिली.
 औरंगाबाद: मालगाडीने 19 मजुरांना चिरडले, 16 जागीच ठार, 3 गंभीर

मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील हे मजूर चंदनझिरा, जालना भागातील एका स्टील कंपनीत कामाला होते. 20 जण काल संध्याकाळी 7 वाजता जालण्याहून निघाले होते. ते रेल्वे रूळावर झोपले होते. पहाटे 5:30 वाजता एका मालगाडीने त्यांना चिरडले. ह्या दुर्घटनेत यात 15 जणांचा जागीच तर एकाच रुग्णालयात मृत्यू झाला, 3 जण जखमी आहे. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत, अशी माहिती करमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ विशाल नेहुल यांनी दिली

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, रेल्वेने मालवाहतूक काही प्रमाणात सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले.

 औरंगाबाद: मालगाडीने 19 मजुरांना चिरडले, 16 जागीच ठार, 3 गंभीर

बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले.

 औरंगाबाद: मालगाडीने 19 मजुरांना चिरडले, 16 जागीच ठार, 3 गंभीर

जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येऊन रेल्वे रुग्णवाहिकाही निघाल्याचे वृत्त आहे. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

 औरंगाबाद: मालगाडीने 19 मजुरांना चिरडले, 16 जागीच ठार, 3 गंभीर

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, सदरील घटना बदनापुर आणि करमाड स्टेशन दरम्यान घडली आहे. हा विभाग रेल्वेच्या परभणी-मनमाड सेक्शनमध्ये येतो. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही मजुर रेल्वे रुळावर झोपले होते. मालगाडी चालकाने त्यांना पाहिले होते, वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, पण घटना घडली. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या    कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  

From around the web