स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी केली कारोनावर मात

 
स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी केली कारोनावर मात

लातूर - स्वामी श्रद्धानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे हरिश्चंद्र गुरुजी) औराद. ता.उमरगा. जि.उस्मानाबाद सध्या रा. राहणार लातूर यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी करोना वर मात करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपल्या किशोर वयापासूनच त्यांनी आसन,प्राणायाम, शाकाहार, आयुर्वेद, दैनिक यज्ञ या भारतीय जीवनशैलीचे आयुष्यभर तंतोतंत पालन केले.

१९८० च्या दशकानंतर जवळपास दोन दशकं पेक्षाही अधिक कार्यकाळ महाराष्ट्रात आर्य समाज ची प्रमुख धुरा सांभाळलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वामी श्रद्धानंद यांनी देशातील अनेक आंदोलनात हिरारीने सक्रिय सहभाग तर नोंदविलाच परंतु अगदी गाव पातळी पासून आपल्या सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली. गावातील मारुतीचे देऊळ बांधणे असोत, गावातील पाणंद रस्ते बांधकाम असोत की गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम आणि त्याच्या परवानगी चे काम असोत स्वामी श्रद्धानंद यांनी कधीही कुठेही तुसभर देखील माघार घेतली नाही. 

तिसऱ्या लोकसभेला उस्मानाबाद लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस पक्षाकडून आलेल्या उमेदवारीला धुडकावून त्यांनी १९ व्या शतकातील थोर समाज सुधारक स्वामी दयानंद सरस्वती द्वारा स्थापित आर्य समाज च्या चळवळीतून आपले कार्य निरंतर चालू ठेवले. हैद्राबाद मुक्ती संग्राम (भूमिगत), गोवा मुक्ती संग्राम (सक्रिय) गो हत्या निषेध आंदोलन (सक्रिय) हिंदी रक्षा आंदोलन(सक्रिय) अश्या कैक आंदोलनात त्यांनी वर्षानुवर्षे जेल भोगली. महाराष्ट्र आर्य समाज चे दोन दशकं बिनविरोध प्रधान अध्यक्ष राहिले. आर्य समाजच्या चळवळी बरोबरच "मानवता संस्कार शिबिर" च्या माध्यमातून "श्रेष्ठ मानव बनो, मानवता मे वृद्धी करो" या ब्रिद वाक्याचा उद्घोष करीत, त्यांनी आयुष्यभर विद्यार्थी घडविण्याचे कार्य ही केले. जे विद्यार्थी आज राज्यभर तसेच देश - विदेशात आध्यात्मिक,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय,प्रशासनिक सेवेत अगदी उच्च पदस्थ अधिकारी, नेते, डॉकटर, शिक्षक, प्राध्यापक, आय.ए.एस.,आय.पी.एस, म्हणून हजारोच्या संख्येने कार्यरत आहेत. जे आज त्यांनी दाखवलेल्या आदर्श मानवीय मूल्यांचे जतन करीत देश आणि समाजाची सेवा करत आहेत.

दि.०६.०४.२०२१ रोजी स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांना  ताप आली आसता यांची सुनआरोग्य खात्यात आसल्यामुळे वेळ न घालवता ताबडतोब कोराणा चाचणी करण्यास सांगीतले असता त्याचा नातु हर्षवर्धन याने त्याची कोरोणाचाचणी केली आसता ती पॉजी टिव आली आसता लगेच त्यांना कराड यांच्या दवाखान्यात भरती करून उपचार सुरू केले त्या दरम्यान स्वताच्या जिवाची पर्वा न करता हर्षवर्धन यांने त्याची दिवस रात्र सेवा करत आसताना २४ तास सोबत राहण्याने ४दिवसी तो सुद्धा कोरोना पॉजिटिव आला परंतु सेवेत कुठलाही खंडन पडु देता स्वतावर उपचार घेत त्याने सेवा केली व तब्बल १२ दिवसाच्या अथक प्रयत्नाने त्यानी कोरोना सारख्या रोगावर मात केली यावेळी त्यांचे अनेक विद्यार्थी डॉ तात्याराव लहाने विकास खारगेडॉ विठ्ठल लहाने डॉ . हनुमंत कराड डॉ कोलपुके डॉ . हा जगुडे डॉ तानाजी आचार्ययांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले सर्व जण रोज फोनवरूण त्याच्या प्रकृतीची विचारपुस करत होतेयावेळी त्याचे राजकिय सामाजिक प्रशासकिय सेवेतील उच्चपदस्थ आधिकारी वर्ग वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रातील तसेच आर्यसभेतील त्याचे शिष्यत्यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या दीर्घायुषा साठी प्रार्थना करीत होते.

ते लातूर स्थित कराड हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. करोनावर विजय मिळवील्या नंतर स्वतः डॉ.हनुमंत कराड यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या स्वास्थ्याची चौकशी केली. स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांच्या कडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी अश्या प्रकारचे मत स्वामीजी च्या शिष्याकडून वर्तविले जात आहे.
 

From around the web