युएनएससीसी'च्या महाराष्ट्र शाखेच्या चेअरमनपदी म्हणून डॉ. अनिल फळे यांची नियुक्ती

 
s

औरंगाबाद - ज्येष्ठ पत्रकार डॉ. अनिल फळे यांची युनिटी ऑफ नेशन्स ॲक्शन फोर  क्लायमेट चेंज कौन्सिल (युएनएसीसी) या युनायटेड नेशन्स व निती आयोग संलग्नित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

गेल्या 32 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेल्या डॉ. अनिल फळे यांनी शाश्वत विकास पत्रकारितेवर अधिक भर दिला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या अप्रतिम मीडिया या बहुआयामी संस्थेच्या व विविध दैनिकांच्या माध्यमातून त्यांनी आजवर शाश्वत विकास ध्येयासंबंधी  उपक्रम राबवले आहेत. पर्यावरण ते राजकारण, ग्रामपंचायत ते विधानसभा अशा क्षेत्रात पत्रकार म्हणून विशेष वृत्त देणाऱ्या पत्रकारांचा चौथास्तंभ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ते अप्रतिम मीडियाच्या वतीने 2010 सालापासून गौरव करतात.  

राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना विकास प्रश्नी मते व्यक्त करण्यासाठी अप्रतिम महावक्ता हा अभिनव प्रयोग त्यांनी संपूर्ण राज्यात आयोजिला होता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससंबंधी पत्रकारांसाठी व अन्य जबाबदार व्यक्तींसाठी ते विशेष कार्यशाळा घेतात. युएनएसीसीचे ग्लोबल चेअरमन रजत शर्मा व जनरल सेक्रेटरी संजीव वर्मा यांनी डॉ. फळे यांच्यावर महाराष्ट्रासाठी चेअरमन म्हणून मुख्य समन्वयाची जबाबदारी सोपविली आहे. 

 यूएनएससीचे युथ कौन्सिल हेड रोहित काळे यांच्यासह डॉ. फळे हे संपूर्ण महाराष्ट्रात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एस डी जी शाश्वत विकास ध्येयाबद्दल जनजागृती करणारे कार्यक्रम करणार आहेत.

From around the web