भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आवाहन

 

औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या सिव्हील सर्व्हीस 2021 चे पूर्व तयारी करीता राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण,केंद्र औरंगाबाद,नाशिक,कोल्हापूर,मुंबई,अमरावती व नागपूर या केंद्रामध्ये प्रवेशाकरीता सामयिक पात्रता परीक्षा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे.  या केंद्रामध्ये सन 2021 चे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रवेश परीक्षा आवेदन पत्र दि.08.02.2021 ते 07.03.2021 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. याबाबत अभिरूप चाचणी ( मॉक टेस्ट ) दि.13.03.2021 रोजी तर सामायिक प्रवेश चाचणी परीक्षा दि.20.03.2021 रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी www.siac.org.in अथवा preiasaurangabad.ac.in या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज मुदतीत सादर करावे, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, औरंगाबादचे संचालक डॉ.वसंत.रा.शेडगे, यांनी केले.

वरील सहा केंद्र महाराष्ट्र राज्याच्या उच्च्‍ व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालविले जात असून यामध्ये पात्र उमेदवारांना निशु:ल्क प्रशिक्षण देण्यात येते.महाराष्ट्रातील युवक, युवतीनां देश पातळीवरील IAS, IPS, IFS इ.केंद्रीय सेवामध्ये प्रवेशित होता यावे या हेतूने शासनाकडून सदर केंद्र चालविण्यात येतात.या केंद्रामार्फत प्रवेशित उमदेवारांना युपीएससी पूर्व,मुख्य व तोंडी परीक्षा या प्रमाणे शासन खर्चाने टप्याटप्याने तयारी करून घेण्यात येते.

From around the web