मौजे विठ्ठलवाडीच्या सरपंच कल्पना शिंदे  यांच्या अपात्रतेला आयुक्तांची स्थगिती 

 
s

औरंगाबाद  - मौजे विठ्ठलवाडी (ता. उस्मानाबाद ) येथील  सरपंच कल्पना हिराचंद शिंदे यांच्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या अपात्रतेलाऔरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. 

विठ्ठलवाडी ग्रामपंचायत निवडणूक साल सन 2020 21 मध्ये सौ. कल्पना हिराचंद शिंदे यांचे पॅनल बहुमताने निवडून आले व सौ. कल्पना हिराचंद शिंदे यांची सरपंच म्हणून निवड झाली. विरोधी गटातील शिवाजी शिवलकर,  शुक्राचार्य पवार व दयानंद जगताप यांनी मा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 नुसार सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध कस्पटे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी अर्ज सादर केला.

सदरील अर्जावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन व तहसीलदार उस्मानाबाद यांनी सादर केलेल्या अहवालावर अवलंबून राहून विठ्ठलवाडीच्या सरपंच कल्पना हिराचंद शिंदे यांना त्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेली आहे असे म्हणून त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध श्रीरंग कस्पटे यांच्या विरोधात दाखल केलेला अर्ज नामंजूर केला.

माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशाच्या नाराजीने कल्पना शिंदे यांनी ॲड. सुशांत चौधरी यांच्यामार्फत मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे दिनांक 14 10 2022 रोजी अपील दाखल केले सदरील अपील मा. विभागीय आयुक्त यांच्यापुढे 27/10/2022 रोजी सुनावणी ठेवण्यात आले. अपील करत्यातर्फे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी पारित केलेल्या आदेशात गंभीर चुका असून तक्रारदाराने तक्रारीमध्ये अपीलकर आपले दिर बालाजी शिंदे यांच्या नावावर असलेल्या मिळकत क्रमांक 191 मध्ये वास्तव्यात असून सदरील मिळकती गायरान जमिनीवर अतिक्रमणीत आहे असे ठरवण्याचा प्रयत्न केला होता. 

 परंतु सदरील मिळकत ही बाबासाहेब सातपुते यांची असून सदरील मिळकतीशी अपीलारथीचा काहीही संबंध नाही तसेच अपीलकाराचे दीर व अपील आरतीचे पती हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून आपिलारथी यांच्या दिराने केलेल्या केलेल्या अतिक्रमणासाठी अपीलार्थिस दोशी धरणे योग्य नाही.  तहसीलदार , उस्मानाबाद यांनी दिलेला अहवाल हा वस्तू स्थितीस धरून नाही तसेच अहवाल बनवताना कोणतयही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता केलेले असल्यामुळे त्या अहवालावर विसंबून आदेशित पारित करण्यात येऊ शकत नाही. विधीज्ञांनी उपस्थित केलेले मुद्दे ग्राह्य धरुन मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशास स्थगिती दिली.


अपीलकर्त्या कल्पना हिराचंद शिंदे यांची बाजू  ॲड. सुशांत चौधरी व ॲड. सागर फटाले यांनी मांडली. प्रकरणातील पुढील तारीख 16 11 2022 रोजी ठेवण्यात आली.

From around the web