नविन ट्रान्सफार्मरसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतुद करावी – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
लातूर - जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खालील महत्वाचे विषय मार्गी लावावे अशी विनंती पालकमंत्री महोदयांकडे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री तात्काळ पुरवठा करणेबाबत, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने विजेची मागणी वाढत आहे व दिवसेंदिवस ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढत आहे ट्रान्सफार्मर वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे नविन ट्रान्सफार्मर बसविणे गरजेचे असून त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद तसेच नादुरुस्त झालेले ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑईलची गरज भासत असून रब्बी हंगामाकरीता शेतकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा होणेकरीता व गरजेप्रमाणे ऑइल पुरवठा मुंबई कार्यालयाकडून प्रति महिना ३६ KL इतका ऑइल पुरवठा करणेबाबत, लंपी आजाराने मृत्यु पावलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ मिळावी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना विविध लाभाच्या योजना मिळत असतात या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व स्वावलंबन होण्याकरीता विविध घटकासाठी अर्थसहाय्य दिले जाते ते पात्र शेतकरी बंधूंना तात्काळ मिळावे.तसेच औसा व निलंगा तालुक्यातील महसूल विभागाची रिक्त पदे तात्काळ भरावी, लातूर ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 हा महामार्ग सहा पदरी मंजूर करणेबाबत नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत असून आपण स्वतः हुन याबाबत पाठपुरावा करावा, 3054 व 5054 अंतर्गत खेडेगावातील रस्त्यांची सुधारणा, PMJSY योजनेतून औसा व निलंगा तालुक्यासाठी जास्तीची लांबी घ्यावी.
खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 13 हजार 600 हेक्टरी मदत जाहीर करून देखील घोषणे प्रमाणे मदत मिळाली नाही ती देण्यात यावी, ग्रामीण भागातील शाळा, वर्गखोल्या बांधकाम प्राधान्याने करावे, शाळेतील मुला-मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असावी, औसा व निलंगा तालुक्यातील क्रीडा संकुल सुस्थितीत ठेवणे बाबत कायमची व्यवस्था करावी, शेवगा लागवड करणे बाबत राज्य स्तरावर धोरण ठरवावे, गावंतर्गत रस्ते MREGS मधून रस्ते मंजूर करणे बाबत गट विकास अधिकारी यांना सूचना द्याव्या, नवीन ट्रान्सफार्मर बसविणेबाबत नाविन्यपूर्ण योजनेतून अधिकची तरतुत करावी अशा विविध मागण्यां पुर्ण करणेबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विनंती केली.
याप्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब भोसले, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वी राज, मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल उपस्थित होते.