ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे

नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा
 
ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाक् युद्ध सुरूच आहे.  'राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही गोष्ट शिवसेनेने लक्षात ठेवावी असा इशाराच नाना पटोलेंनी राऊतांना दिला आहे. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राऊतांकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवायला हवी, असेही पटोले म्हणाले.


संजय राऊतांकडून शरद पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यावरुन काँग्रेसकडून राऊतांवर निशाणा साधला जात आहे. शनिवारी भिवंडी येथे माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी या विषयावर भाष्य केले आहे.


पुढे पटोले म्हणाले की, दिल्लीमध्ये यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि यासाठी नेतृत्त्व शरद पवारांना द्यावी ही हस्यास्पद मागणी आहे. तसेच शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल. तर राऊत हे शिवसेना नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत मात्र ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत' असा टोला पटोलेंनी लगावला आहे.

From around the web