शरद पवार हे  राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात

महाआघाडीतील धुसफूस सुरूच 
 
शरद पवार हे  राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाआघाडीत धुसफूस सुरूच आहे.  काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करीत मोठं विधान केलं आहे. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय आहे? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर आज काँग्रेसमधली रँक आणि फाईलची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरु घराण्याची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे. सोनिया आणि राहुल त्याच घराण्यातील असल्यामुळे त्या पक्षातील बहुतांश लोक त्याच विचारसरणीचे आहेत, असं पवार म्हणाले. राहुल गांधींचं नेतृत्त्व मानायला तयार आहेत का असं विचारला असता पवार म्हणाले की, "त्यांच्यात कन्सिस्टन्सी कमी आहे."

त्यावर  काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी  नाराजी व्यक्त करीत "सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं," असं ट्वीट केलं आहे. त्यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली नाराजी बोलून दाखवली.

शरद पवार हे  राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात

शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.  यशोमती ठाकूर यांच्या भूमिकेचंही थोरात यांनी समर्थन केलं आहे.

एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची जवळीक तर दुसरीकडे काँग्रेस नाराज असल्याचे दिसून येत आहे.महाआघाडीतील ही धुसफूस अशीच चालू राहिल्यास ठाकरे सरकार धोक्यात येऊ शकते. 
 

From around the web