मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण

 
मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण


मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.


मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचाचारी यांची तातडीने तापसणी होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले जाण्याचीही शक्यता आहे. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. जवळपास 180 हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.

करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढते आहे. मुंबईत आता ४९० रुग्ण झाले आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री ज्या भागात आहे त्याच परिसरात एकाला करोनाची लागण झाली आहे. ही बातमी समजताच हा भाग सील करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यांनी त्यावेळीही सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच गरज पडल्यास घराबाहेर पडू नका असंही म्हटलं होतं. आता मातोश्री परिसरातच करोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची आणि मातोश्री या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.


From around the web