सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकारच नाही - खा. नारायण राणे

 

 

 सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकारच नाही - खा. नारायण राणे


मुंबई -  शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळव्यातील भाषणावर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी जोरदार  टीका केली आहे. मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख करीत त्यांनी शिवराळ भाषा वापरली


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविजयी मेळावा कार्यक्रमातील भाषण हे निराशाजनक आणि मुख्यमंत्रीपदाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे होते होते. सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे खा. राणे म्हणाले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते या वेळी माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.


 राणे म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत जे – जे मुख्यमंत्री पाहिले त्यांनी स्वत:च्या भाषाशैलीने, कार्याने, कामाने स्वत:ची प्रतिष्ठा राखली. मात्र याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद ठरले.  ठाकरे हे वर्षभरापासून राज्याचा कारभार सांभाळत आहेत. मात्र, वर्षभरानंतरही भाषणात काय बोलावे यांचे त्यांना भान नाही. शेतकरी, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था या सर्व प्रश्नांना बगल देऊन ते काहीही बरळत होते, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.    


खा.  राणे म्हणाले की, देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत , मात्र त्यांचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात साधा उल्लेखही  केला नाही हे दुर्दैव आहे. राज्यातील 42 हजार कोरोना मृत्यूंची जबाबदारी घेणे ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे . मात्र त्याबद्दल मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत.  ज्या मुख्यमंत्र्याला आपले राज्य सांभाळता येत  नाही त्यांनी पंतप्रधानांना देश सांभळण्याचे आणि धोरणाबद्दल सल्ले देऊ नये. 


खा.  राणे म्हणाले की, जोवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत तोवर मराठ्यांना आणि धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यांना कायद्यांची आणि घटनेची माहितीच नाही.  आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची मदत घेऊन पूर्ण अभ्यास करावा. केवळ घरात बसून अभ्यास होत नाही तर त्यासाठी बाहेरही पडावे लागते. आज शिवसैनिकांमध्ये असंतोष धुमसत आहे. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील कामेच होत नाही, त्यांना कोणी विचारत ही नाही. मुळात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बेताल गप्पा मारण्याऐवजी केलेली कामे जनतेसमोर मांडण्याची गरज होती, असेही खा. राणे यांनी नमूद केले .

From around the web