राज्यात २२९ नव्या रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण संख्या 1364

 

राज्यात २२९ नव्या  रुग्णांची नोंद,  एकूण रुग्ण संख्या 1364

मुंबई- राज्यात आज कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे.  कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात 25 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता 97 वर पोहोचली आहे. तर 125 रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.


आज झालेल्या मृत्यूपैकी पुण्यातील 14 मुंबईतील 9, मालेगाव, रत्नागिरी येथील एकाचा समावेश आहे. यामध्ये 15 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 12 जण 60 वर्षांपुढील आहेत. तर मुंबईतील एका महिलेचं वय 101 वर्ष आहे. 11 रुग्ण हे 40 ते 60 वयोगटातील आहे. तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णापैकी 21 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे आजार आढळले आहेत.

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?
मुंबई – ८७६
मृत्यू -५४
पुणे- १८१
मृत्यू २४
पिंपरी चिंचवड-रुग्ण-१९
पुणे ग्रामीण-६
ठाणे-२६ रुग्ण
मृत्यू ३
कल्याण डोंबिवली-३२
मृत्यू-२
नवी मुंबई-३१
मृत्यू-२
मिरा भाईंदर-४
मृत्यू-१
वसई विरार-११
मृत्यू-२
पनवेल-६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण- प्रत्येकी ३
मृत्यू १
सातारा-६
मृत्यू-१
सांगली-२६
नागपूर-१९
मृ्त्यू-१
अहमदनगर-१६
बुलढाणा-११
मृत्यू १
अहमदनगर ग्रामीण-९
औरंगाबाद-१६
मृत्यू-१
लातूर-८
अकोला-९
मालेगाव-५
मृत्यू-१

कोल्हापूर-५
रत्नागिरी, यवतमाळ, अमरावती-४
उस्मानाबाद - 3
उल्हासनगर, नाशिक, नाशिक ग्रामीण जळगाव, जळगाव ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग
या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण
मृत्यू २ (जळगाव)
इतर राज्यातील-८
एकूण १३६४
मृत्यू ९७

From around the web