लॉकडाऊन शिथिल होईल, असे कोणी डोक्यात ठेऊ नये - राजेश टोपे

 

लॉकडाऊन शिथिल होईल, असे कोणी डोक्यात ठेऊ नये - राजेश टोपे

कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात तसेच राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवणार की नाही याबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र १५ तारखेनंतर लॉकडाऊन हे १०० टक्के शिथिल होईल, असे कोणी डोक्यात ठेऊ नये, असा खुलासा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

याआधी सार्स, मर्स, एच१एन१, अशाप्रकारचे जे साथीचे रोग होऊन गेले त्यावेळी लॉकडाऊनची परिस्थिती नव्हती. मात्र कोरोना आजाराचा फैलाव जगभरात वेगाने होत असल्याने आणि त्याला महामारी घोषित केले असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. अनेक देशांचे केस स्टडीज करून लॉकडाऊन कसे शिथिल करता येईल यावर अभ्यास सुरू आहे. केंद्र शासन याबाबत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे यावर निर्णय घेतील. राज्यात १० ते १५ एप्रिलपर्यंत असलेल्या परिस्थितीवर पुढील दिशा अवलंबून असेल, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊन शिथिल होईल, असे कोणी डोक्यात ठेऊ नये - राजेश टोपे https://www.osmanabadlive.com/2020/04/maharashtra-corona-lokdown-rajesh-tope-byee.html

Posted by Osmanabad Live on  Monday, April 6, 2020

From around the web