पुण्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले, जिल्ह्यात एकूण २३ रुग्ण

 
पुण्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले, जिल्ह्यात एकूण २३ रुग्ण

पुणे  - जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा वाढत चालला आहे, आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 21 मार्च 2020 रोजी सकाळी 9 वाजतापर्यंत भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 258 होती. आता ही संख्या वाढून 260 झाली आहे. देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. 22 लोक बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात आणखी दोन घटनांची पुष्टी झाली आहे. पुणे जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आणखी दोन जण कोरोना विषाणूची लागण झाले आहेत. पुण्यात रूग्णांची संख्या 23 झाली आहे. महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या 63 झाली आहे.

राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत,

स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

पुण्यात आणखी दोन रुग्णांची पुष्टी

पुणे जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी सांगितले की, जिल्ह्यात आणखी दोन जण कोरोना विषाणूची लागण झाले आहेत. पुण्यात रूग्णांची संख्या 23 झाली आहे. महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या 63 झाली आहे. त्यातील एक आयर्लंडहून परतला होता.


From around the web