महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी , कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने वाढ

 

महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी ,  कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने वाढ
मुंबई महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण 3 जणांचे बळी घेतले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत चालला  आहे. राज्यातील   कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.

नवी मुंबईत राहणारा हा ६८ वर्षीय व्यक्ती फिलीपाइन्सचा आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याचं मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. या व्यक्तिचा कोरोनाचा प्राथमिक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला होता. सुरुवातीला त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तिला दम्याचा आणि मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लक्षणं आढळल्याने त्याला १३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


कोरोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 396 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील सुरत येथे एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याआधी बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी ,  कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने वाढ
महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. 
रुग्णसंख्या वाढली आहे मात्र लोकांनी काळजी करु नये. शक्यतो घरी रहावं, घराबाहेर पडू नये. स्वयंशिस्त पाळावी अशी विनंती आणि आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. रविवारचा पूर्ण दिवस भारताने जनता कर्फ्यूचं पालन केलं. मात्र लोकल ट्रेन बंद असल्याने सोमवारच्या दिवशी खासगी वाहनांनी मुंबईत जाण्यासाठी गर्दी होते आहे. ही गर्दी करणं चुकीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा. आज जे अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असाही इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

From around the web