कोरोना : राज्यात अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद - मुख्यमंत्री

 
कोरोना : राज्यात अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद - मुख्यमंत्री

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अन्नधान्य, दूध, मेडिकल, बँका वगळता इतर दुकानं  ३१ मार्चपर्यंत बंद करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. तर शासकीय कार्यालयात केवळ २५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.फेसबुक लाईव्हवरुन राज्याला उद्देशून संवाद साधला, त्यात त्यांनी ही घोषणा केला.

रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व कार्यालय आणि दुकानं ३१ मार्चपर्यंत बंद करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.

From around the web