आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिष्टचिंतन

 
उस्मानाबाद – तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतन केले आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून समाजाची सेवा घडो, अशी प्रार्थना आई तुळजाभवानीच्या चरणी अनेकांनी केली आहे.
विधानभवन मुंबई येथे वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गिरीशजी महाजन, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, आ.सुजितसिंह ठाकूर यांनीही शुभेच्छा दिल्या.
आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरातील ग्रामदैवत धारासूरमर्दिनी देवी मंदिर येथे आरती करण्यात आली. तसेच हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (रहे) दर्गाह येथे चादर चढवून आ.राणादादा पाटील यांना दीघायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, मसूदभाई शेख, पांडुरंग लाटे सर, नगरसेवक सर्वश्री युवराज नळे, माणिक बनसोडे, अभय इंगळे, बाबा मुजावर, गणेश खोचरे, अभिजीत काकडे, बापू पवार, दत्ता पेठे, बबलू शेख, राजसिंह राजेनिंबाळकर, इलियास पिरजादे, सिधोजीराजे राजेनिंबाळकर, प्रल्हाद धत्तुरे, मैनोद्दीन पठाण, राज निकम, बिलाल तांबोळी, नाना घाटगे, रमण जाधव, बिलाल रझवी, अमोल राजेनिंबाळकर, अनिल पवार, मुजम्मिल काझी, अन्सार रझवी, विलास सांजेकर, रमेश बनसोडे, महेश गंगणे, अजय यादव, सय्यद मुज्जमील, गयाज मुल्ला आदी उपस्थित होते.
तुळजापूर मतदारसंघात यंदा परिवर्तन घडले आणि जिल्ह्यात राणा जगजितसिंह पाटील यांच्या रूपाने जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप  कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य पसरले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळेल अशी जनतेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण झाल्यास जिल्हयाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. 


From around the web