कोरोना : देशात १०७ तर राज्यात ३६ ...

 
कोरोना : देशात १०७ तर राज्यात ३६ ...
मुंबई - राज्यात ३६  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. एकट्या शहरात १६ रुग्ण आढळून आले आहेत तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 80 संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांची दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 14 मार्च या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. सध्या रुग्णाची प्रकृती स्थीर असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती.
आज एकूण 9 संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट्स आले. यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर इतर आठ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान दुबई आणि जपानचा प्रवास करून आले आहेत. तर 14 मार्चला यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याव्यतिरिक्त अन्य 11 संशयित रुग्णांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. यांच्यावर भोसरी येथील महापालिकेच्या नव्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
 • महाराष्ट्र -33
 • केरळ - 22
 • पंजाब - 1
 • दिल्ली - 7
 • जम्मू कश्मीर - 2
 • लडाख - 3
 • राजस्थान - 4
 • उत्तरप्रदेश - 11
 • कर्नाटक - 6
 • तामिळनाडू - 1
 • तेलंगाना - 3
 • हरयाणा - 14
 • आंध्रप्रदेश - 1

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर
 • पुणे - 16
 • मुंबई - 5
 • ठाणे - 1
 • कल्याण- 1
 • नवी मुंबई -  1
 • पनवेल - 1
 • नागपूर - 4
 • अहमदनगर - 1 
 • यवतमाळ -2
 • औरंगाबाद - 1

From around the web