कोरोना : लातूरमध्ये ३१ मार्च पर्यंत वृत्तपत्र वाटप बंद

 
कोरोना : लातूरमध्ये ३१ मार्च पर्यंत वृत्तपत्र वाटप बंद

लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लातूर शहरात २४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत कोणताही वृत्तपत्र विक्रेता घरोघरी वृत्तपत्र वाटप करणार नाही किंवा बुक स्टॉल उघडणार नाही. त्यामुळे वृत्तपत्रांनाही कोरोनाचा  मोठा फटका बसणार आहे,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातुरात सर्व व्यापारपेठ ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, त्यामुळॆ सर्वच व्यापाऱ्यांनी काही दिवस वृत्तपत्र बंद करण्यास सांगितले होते, तसेच लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना बाहेर रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे, त्यामुळे लोक बुक स्टॉलवरही येत नाहीत, त्यामुळे वृत्तपत्र विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. 

कोरोनाची धास्ती तसेच वृत्तपत्राचा कमी झालेला खप यामुळे लातूर जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाने ३४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र वाटप न  करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लातूर शहरात सर्व वृत्तपत्रे मिळून ५० ते ६० हजार खप आहे, असे  लातूर जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे सचिव मनोज कुदळे यांनी सांगितले. From around the web