महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १२४, चार जणांचा मृत्यू

 
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १२४, चार जणांचा मृत्यू

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण चार जणांचे बळी घेतले आहेत. 
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. काल संध्याकाळी, मुंबई 1 व ठाणे 1 असे 2 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.    
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ६७८  कोरोना बाधित असून त्यातील 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. पैकी ४३ जणांवर उपचार झाले असून त्यांना रुग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला काल   गुढीपाडव्याला  नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

From around the web