भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक

 
भाजप नेते किरीट सोमय्या  यांना अटक


मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या पीडित अनंत करमुसे याला भेटण्यासाठी जात असताना, पोलिसांनी मला घरातच स्थानबद्ध केलं. त्यानंतर अटक करुन नवघर पोलीस स्टेशनला नेलं, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

पोलिसांनी मला माझ्या मुलुंडमधील निवासस्थानावरुन अटक केली असून मुलुंड पश्चिममधील नवघर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे.

From around the web