बुलडाणाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

 
बुलडाणाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती


      मुंबई-  बुलडाणाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी यासंबंधीचे पत्र श्री. शिंदे यांना दिले आहे.

    माजी  आमदार विजयराज शिंदे पूर्वी शिवसेनेत होते. ते शिवसेनेकडून तीन  वेळा आमदार झाले होते, परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव  झाला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारून संजय गायकवाड यांना  उमेदवारी दिली होती, म्हणून शिंदे यांनी ऐनवेळी वंचीत बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव  झाला होता.

माजी आमदार शिंदे यांनी नुकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश  केला आहे. श्री. शिंदे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ भाजपाच्या वृद्धीसाठी आणि संघटनात्मक वाढीसाठी नक्की होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

From around the web