भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे खोचक ट्विट 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी  ‘शुर्पणखा’  नको... 
 
d

मुंबई - गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त प्रसारित होताच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट केले आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया राहटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सन २०१९ च्या विधानसभा  निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले , त्यामुळे  राहटकर यांना पायउतार व्हावे लागले पण  दीड वर्षे झाले तरी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. 

राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. त्यात राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने भाजपला  आयते कोलीत मिळाले आहे. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त प्रसारित होताच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी  खोचक ट्विट केले आहे.

d

वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत,  पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे , अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल. 

रुपाली चाकणकर यांना उद्देशून चित्रा वाघ यांनी  ‘शुर्पणखा’ ची उपमा दिल्याने आता राजकारण आणखी तापणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला यावर काय भाष्य करणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 


 


 

From around the web