भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामास मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ

209 कोटी कंत्राटदारास अदा  /  इमारतींचे 49 टक्के काम पूर्ण / पादपीठाचे 6 टक्के  काम पूर्ण
 
s

मुंबईतील इंदू मिल येथील सुरु असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामास मुदतवाढ दिली असून मार्च 2024पर्यत काम पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत 209 कोटी रुपये कंत्राटदारास दिले असून इमारतींचे 49 टक्के तर पादपीठाचे 6 टक्के काम पूर्ण झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाबाबत विविध माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले आहे स्मारकाचे मुळ संकल्पनेनुसार अपेक्षित खर्च 763.05 कोटी आहे व त्यास सुधारित संकल्पनेनुसार 1089.95 कोटी रुपये इतकी मान्यता देण्यात आली आहे. आजतागायत प्रकल्पातील एकूण 209.53 किती 23 नोव्हेंबर 2021 रोजी अदा करण्यात आले आहे यात मोबीलायझेशन ऍडव्हान्स रु 31.65 कोटी व प्रकल्प सल्लागाराचे शुल्क रु 12.68 कोटींचा अंतर्भाव आहे. यात कंत्राटदार मेसर्स शापूरजी पालोनजी तर प्रकल्प सल्लागार मेसर्स शशी प्रभू असोशिएट्स आणि डिझाईन असोशिएट्स आयएनसी आहेत.

सद्यस्थितीत प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचे 49 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे तर स्मारकातील पादपीठाचे 6 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास वाढीव कालावधी मार्च 2024 पर्यंत देण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून 36 महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. 

अनिल गलगली यांच्या मते प्रकल्प 14 महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना कंत्राटदारांकडून उशीर करण्यात आला आहे. हा प्रकल्प आता वाढीव मुदतवाढीत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए तर्फे योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. याबाबत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच एमएमआरडीए आयुक्त यांना पत्र पाठविले आहे.

From around the web