लोहाऱ्याची अनिता मोरे झळकणार 'का रं देवा' मध्ये...

 
zx

अनिताचा जन्म उस्मानाबाद जिल्हा, लोहारा गाव (तालुका) इथे झाला... घरची परिस्थिती तशी बेताचीच.. वडील शिक्षक, त्यात संपूर्ण माळकरी कुटुंब, त्यामुळे तिच्यावर खूप चांगले संस्कार झाले. लहानपणापासून तिला कलेची आवड. शाळेत आवडीने कार्यकमात भाग घ्यायची.. अभिनयाची आवड होती, पण गावात नाटक हि होत नव्हते, तर सिरीयल, चित्रपट खूप लांबची गोष्ट.. सांगलीला दहावी नंतर भावाकडे पुढील शिक्षणासाठी गेली. त्याच वेळेस भाग्यश्री चा “मैने प्यार किया” चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. भाग्यश्री सांगलीची, त्यामुळे अनिताला सुद्धा अभिनय करण्याची इच्छा झाली. पण वडिलांनी कडाडून विरोध केला. आणि तिला परत गावाकडे बोलावले गेले व कमी वयात १९९० ला लग्न झाले. नवऱ्याच्या नोकरीमुळे २०१३ ला उस्मानाबादला आली. तिथे त्यांचे कपड्याचे दुकान होते, तर मिस्टर शिक्षक. तिथे मैत्रिणीच्या घरी एका मराठी चित्रपटाचे शुटींग सुरु होते. फिल्म मध्ये  एक बंगल्याच्या मालकिणीचा रोल होता. अजून कलाकार शोधणे सुरूच होते. मैत्रिणीच्या सांगण्यावरून अनिता शूट साठी लागणाऱ्या साड्या घेवून तिथे गेली होती. दिग्दर्शकाने अनिताला बघितल्यावर काम करणार का विचारले. आणि अभिनयाला सुरुवात झाली. चित्रपटात सीमा कुलकर्णी, डॉ विलास सर आणि अंजली उजवणे ताई हे काम करत होते. नवऱ्याला मात्र ते अजिबात त्या वेळेस आवडले नाही. 

२ मुलगे आणि १ मुलगी असा संसार सुरु झाला. अनिता आपल्या संसारात रमली होती. पण तिच्या नशिबात अभिनय लिहिला होता. अनिता २०१४ पुण्यात मुलीच्या शिक्षणासाठी आली. आणि पहिल्यांदा नाटक बघायला बाल गंधर्व ला गेली. नाटक होते “सही रे सही”. नाटक बघताना अनिताच्या मनात सतत येत होते कि, आपले सुद्धा नाटक बाल गंधर्वला झाले पाहिजे. नेमकी अभिनेत्री सीमा कुलकर्णी सुद्धा पुण्यात आली आणि तिची भेट झाली. तेव्हा ती एक नाटक करत होती. तिने अनिताला विचारले कि ताई नाटकात काम करणार काय? सीमा बरोबर नाटकाच्या रिहर्सल ला गेली. पण गावरान भाषेमुळे अनेक वेळा सर्वांची बोलणी ऐकावी लागत. अनेक वेळा रडू सुद्धा येत असे. पण बालगंधर्वला नाटक करायचे स्वप्न पूर्ण करायचे होते, म्हणून सगळा अपमान सहन करत होती. सोबत जिद्द होतीच. ते स्वप्न तिने पूर्ण करून दाखवले. पुढे अनिताला मुलांची साथ मिळाली, त्यांनी बाबांना (अनिताच्या नवऱ्याला)  पटवले आणि अनिताचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. त्यात आईची सर्वात जास्त साथ मिळाली.  साध्या, सरळ स्वभावाची गृहिणी, होती.   जास्त शूट मुंबई आणि मुले पुण्यात कसे जमणार होते. रोजचा पुणे मुंबई प्रवास शक्यच नव्हता. 

d

अनिताने आता पर्यंत “कॉलेज एक्स्प्रेस”, “चिठ्ठी”, “कारवा एक काफिला”(हिंदी आर्ट फिल्म), “सरकारमान्य”, “ओ रे प्रिया”, “न्यायम”, “युवा अंडर १८”, “प्रेमाचं असंच असतं”, ६६ सदाशिव पेठ, “पेन्शन”, “का रं देवा” अश्या अनेक हिंदी मराठी फिल्म्स मध्ये अभिनय केला.

चित्रपटा बरोबर “कृष्णा काठच्या कथा”, “क्राईम अलर्ट”,  “मेरी बीबी हानिकारक है”, “प्रेमा  तुझा रंग कसा”, “सह कुटुंब सह परिवार”, “बाळूमामा”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “देव पावला”, “स्वराज्य जननी जिजामाता”, “रंग माझा वेगळा”, “मोलकरीण बाई”, “स्वाभिमान शोध अस्तित्वाचा” अश्या अनेक मराठी हिंदी सिरीयल मध्ये अनिता चमकली. चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये (दूरदर्शन) सुद्धा भूमिका केली आहे.

सुरुवातीच्या काळात तिने “मु.पो. केळेवाडी”, “पुरुष”, “१/४ गांधी नगर”, “वैरी झाला कुंकवाचा” अश्या नाटकात हि अभिनय केला.  

तीने “भूताटलेला” ह्या एम एक्स प्लेअर वरील वेब सिरीज मध्ये उत्तम अभिनय केला आहे.

"गाजर" ह्या अवार्ड विनिंग शॉर्ट फिल्म अनिताने उत्तम अभिनय केला आहे.

“का रं देवा” हा तिने अभिनय केलेला चित्रपट फेब्रुवारी ११ ला  प्रदर्शित होत आहे. त्यात तिची मोठी भूमिका असून त्याचे नक्कीच सगळे कौतुक करतील अशी आशा आहे. 

.  अनिताला पुढील वाटचालीसाठी  खूप खूप शुभेच्छा !!

From around the web