बुलेटचं स्वप्न होणार सिनेमा पाहून साकार !

"लॉ ऑफ लव्ह" चित्रपट सिनेमागृहात पाहणाऱ्या मिळणार "रॉयल एनफिल्ड"
 
g

मुंबई  - वेदिका फिल्म क्रिएशनचा ४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा "लॉ ऑफ लव्ह" हा मराठी चित्रपट सिनेमागृहात पाहणाऱ्या ५० भाग्यवान विजेत्यांना "रॉयल एनफिल्ड" ची बुलेट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही संधी ४ फेब्रुवारी २०२२ पासून चित्रपट चित्रपटगृहात असेपर्यंत पर्यंत उपलब्ध असणार आहे.

 या स्पर्धेत सहभागी होणाय्साठी "लॉ ऑफ लव्ह" या सिनेमाचे तिकिटाच्या मागील बाजूस स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क नंबर नमूद करून ओरिजनल कॉपी वेदिका फिल्म क्रिएशन हणमंत नगर, विटा तालुका खानापूर या पत्त्यावर पाठवायचे आहे. लकी ड्रॉ मार्फत ५० भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. 

आयोजकांच्या निर्णयानुसार सोशल मीडिया मार्फत लकी ड्रॉ ची तारीख घोषित करण्यात येईल. याबाबतची माहिती वेळोवेळी लाॅ ऑफ लव्ह चित्रपटाच्या आणि वेदिका फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केले जाणार आहे. तसेच अधिक माहिती साठी वेदिका फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेजला भेट द्या किवा 9156177135 , 9975836266,  9860419737 या नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान वेदिका फिल्म क्रिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/100457349215152/posts/108198768441010/

https://www.facebook.com/112759727073354/posts/478102113872445/

From around the web