ओ शेठ गाण्याच्या मालकी हक्कावरून संगीतकार आणि गायकात वाद पेटला 

युट्युबने स्ट्राईक टाकल्याने उस्मानाबादचा शेठ - प्रणिकेत खुणे हतबल 
 
s

उस्मानाबाद : भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या 'ओ शेठ' गाण्याच्या मालकी हक्कावरून संगीतकार आणि गायक यांच्यात वाद पेटला आहे. दोघांच्या वादात युट्युबने हे गाणे हटवल्याने दोघांवरही नामुष्की ओढवली आहे. हे गाणं बनवलंय म्हणजे लिहिलं, संगीतबद्ध केलं उस्मानाबादच्या प्रणिकेत खुणे  आणि नाशिकच्या संध्या केशे यांनी तर गायलं उमेश गवळी यांनी. आता हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला आहे तर  गायक गवळी यांनी हा आरोप फेटाळला आहे. 

सोशल मीडियावर 'ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट' हे गाणं प्रचंड गाजलं. अनेकांनी या गाण्यावर रिक्रिएशन करत डान्सचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. उमेश गवळी यांनी हे गाणं गायलं आहे. मात्र आता हेच गाणं चोरीला केल्याचा आरोप निर्मात्यांनी केला आहे. प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी उमेश गवळीवर गाण्याच्या चोरीचा आरोप केला आहे. "या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आम्ही आहोत आणि आमच्याच युट्यूब चॅनेलवर गायक उमेश गवळी यांनी कॉपीराइटचा दावा केला आहे. युट्यूबकडून आम्हाला स्ट्राइक आल्याने आमचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे", असं प्रणिकेत म्हणाले.


अनेक कंपन्या हे गाणे आपल्या मालकीचे व्हावे म्हणून प्रयत्न करत होत्या. मात्र आता खुद्द गायक उमेश गवळीने हे गाणे आपल्या मालकीच असल्याचा दावा केल्याने या दोघांच्या यूट्यूब चैनलवर कॉपीराइट दाखल केला आहे  त्यामुळे दोघेही आता हतबल झाले आहेत. गीतकारांनी गायकावर आरोप केला आहे की, त्याने आपले गाणे चोरले. त्यांनी तशी नाशिक पोलिसांत तक्रार केली आहे. पण यासोबतच गायकाने देखील गीतकाराविरोधात तक्रार केली आहे. 

उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना संध्या केशे यांनी सांगितलं की, गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी गाण्याची चोरी केली आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आम्ही आहोत आणि आमच्याच युट्युब चॅनेलला गायक उमेश गवळी यांनी स्ट्राईक टाकला आहे. युट्युब चॅनेलला स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शिवाय आम्हाला आमच्याच कलाकृतीची चोरी झाल्यानं मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे.  

हा आरोप गायक उमेश गवळी यांनी फेटाळला आहे. आम्ही परस्पर समजुतीतून हे गाणं तयार केलं. या गाण्याचं कुणीही एक मालक नव्हतं, आम्ही तिघेही मालक होतो. या गाण्यासाठी त्या दोघांनी माझ्याशी संपर्क केला. मी आधीपासून गाणी गातो. मला या गाण्यासाठी कुठलंही मानधन मिळालं नाही. ऑडिओ त्यांच्या चॅनलला आणि व्हिडीओ माझ्या चॅनलला असं आमचं ठरलं होतं. माझ्या चॅनलला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी माझा चॅनेल ब्लॉक केला. त्यांचे आरोप खोटे आहेत.

From around the web