चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज किमान सातशे पेक्षा अधिक रुग्ण पॉजिटीव्ह निघत असून, दररोज मृत्यू १५ ते २० होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून कोरोना पॉझिटिव्हीटी रेट राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ४४८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २९ जार ६६७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९०३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८७८ झाली आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट (27 एप्रिल)-
उस्मानाबाद जिल्हयात टेस्ट केल्यापैकी सुमारे 34.55 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत आणि राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी रेट पेक्षा 11 टक्के अधिक आहे .
राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हीटी रेट असणारे जिल्हे
- पालघर- 37.10 टक्के
- बुलढाणा-36.67 टक्के
- नाशिक- 36.24 टक्के
- अहमदनगर- 34.62 टक्के
- उस्मानाबाद-34.55 टक्के
उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर (19 ते 25 एप्रिल)
राज्याचा सरासरी मृत्यू दर -0.94 टक्के
- सिंधुदुर्ग मृत्यु दर-3.66 टक्के
- नांदेड मृत्यु दर-3.46 टक्के
- उस्मानाबाद मृत्यु दर-2.46 टक्के
- सोलापूर मृत्यू दर-2.43 टक्के
- अमरावती मृत्यु दर-2.14 टक्के
(राज्य शासनाकडील अधिकृत माहितीच्या आधारे)
उस्मानाबाद जिल्हयातील वाढलेला हाच पॉझिटिव्हीटी रेट, आणि मृत्यू दर लोकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता असून संसर्गाच्या फैलावाचा वेग रोखण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांचा भोंगळ कारभार नडत आहे.