उस्मानाबादेत पाच  हजार रुपयांची लाच घेताना दोघे चतुर्भुज

 
उस्मानाबादेत पाच  हजार रुपयांची लाच घेताना दोघे चतुर्भुज

उस्मानाबाद - पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणतर्फे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या खासगी प्रतिनिधीस व त्याच्या साथीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागावच्या पथकाने अटक केली आहे. 

महावितरण कडून कंत्राटी कामगारांच्या नियुक्ती करण्यासाठी मे. डी. एम.दहिफळे,परळी, जि. बीड यांना एक वर्षाचे कंत्राट मिळालेले आहे. सदर कंपनीचे प्रतिनिधी अमोल हनुमंतराव सूर्यवंशी याना ह्या कामासाठी कंपनीने नेमलेले आहे.यातील तक्रारदार  यांचा यंत्रचालक म्हणून १५/१०/२०२० रोजी कालावधी संपल्याने कामावरून कमी करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना नवीन एक वर्षासाठी नियुक्तीचे आदेश देण्यासाठी अमोल सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष १०,०००/- रुपयांची मागणी करून ५०००/- रुपये लागलीच व उर्वरित ५०००/- रुपये पहिला पगार झाल्यावर स्वीकारण्याचे मान्य केले.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधला.त्यांचे तक्रारी वरून शहानिशा केली.

आरोपी अमोल हनुमंतराव सूर्यवंशी, रा.तांबरी विभाग,उस्मानाबाद याने आरोपी इसम नामे फुलचंद ललित फंड रा.बार्शी नाका, उस्मानाबाद याचे मार्फत तक्रारदाराकडून  ५०००/-रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंबंधाने पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कार्यवाही .पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार,औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक, उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पो.ना. जाधव, मारकड, पो.कॉ.बेळे,डोके,तावस्कर,आचार्य यांनी पार पाडली.

From around the web