राणा जगजितसिंह पाटील पुन्हा स्वगृही परतणार का ?

 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा फोटो शेयर केल्याने 
कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या !

राणा जगजितसिंह पाटील पुन्हा स्वगृही परतणार का ?

तुळजापूर - तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतचा एक फोटो शेयर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने भाजपसह राष्ट्रवादी कर्यकर्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस, यानिमित्त तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी फेसबुकवर अजित पवार यांच्या सोबतचा एक फोटो शेयर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

जनसामान्यांच्या कल्याणासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे एक आदर्श नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार...
प्रत्येक विषयाची आणि जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण, प्रचंड लोकसंग्रह, सर्वसमावेशकता, कोणत्याही प्रश्‍नांवर कौशल्याने मार्ग काढण्याची हातोटी हे त्यांचे गुण प्रत्येकाने घ्यावे असेच आहेत.त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतणार का ? 

तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या  राणा जगजितसिंह यांच्या  आत्या आहेत.

 राणा जगजितसिंह हे अनेक वर्ष राष्ट्रवादी मध्ये होते. त्यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे सर्वात जुने सहकारी, पण ऐन विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील  यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता, त्यांना उस्मानाबाद ऐवजी  तुळजापूरला उमेदवारी मिळाली, ते काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांना पराभूत करून निवडून आले पण भाजपची सत्ता न आल्याने त्यांना पुन्हा मंत्री पदापासून वंचीत राहावे लागले. ते राष्ट्रवादी मध्ये असते तर कॅबिनेट मंत्री आणि उस्मानाबादचे पालकमंत्री राहिले असते, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मत आहे.
एक सक्षम नेता भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी उस्मानाबाद जिल्ह्यात पोरकी झाली आहे तर भाजप मजबूत झाला आहे. दादा पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीमध्ये परतणार का ? अशी कुजबुज सुरु झाली आहे.

जनसामान्यांच्या कल्याणासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे एक आदर्श नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा...
Posted by Ranajagjitsinha Patil on  Tuesday, July 21, 2020

From around the web