नळदुर्ग शहर झाले कोरोनाचे हॉटस्पॉट @12

 
नळदुर्ग शहर झाले कोरोनाचे हॉटस्पॉट @12


नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरातील आणखी दोन रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे नळदुर्ग शहरातील कोरोना रुग्णाची संख्या आता बारा झाली आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १७७ तर  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३९ झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४४ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी  लातूर येथे पाठवण्यात आला होता, पैकी दोन पॉजिटीव्ह, चार रिजेक्टेड, एक inconclusive आणि ३७ निगेटिव्ह रिपोर्ट आले  आहेत.  पॉजिटीव्ह दोन्ही रुग्ण नळदुर्ग शहरातील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. विशेष म्हणजे काल ( शनिवारी ) नळदुर्ग शहरातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. त्यामुळे या शहरातील कोरोना रुग्णाची संख्या बारा झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण अकरा आहेत. नळदुर्ग शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, यामुळे नळदुर्गसह अणदूर, जळकोट, वसंतनगर, तुळजाभवानी कारखाना परिसराला धोका निर्माण झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण १७७ आढळून आले असून, पैकी १३२ रुग्ण बरे झाले आहेत , तर ६ रुग्ण  मृत्यू पावले असून, जिल्ह्यात सध्या  ऍक्टिव्ह रुग्ण ३९ आहेत.


From around the web