नळदुर्ग जवळील ढाब्यावर मूकबधिर व्यक्तीला गुलामाची वागणूक 

पायाला साखळदंड बांधून स्वयंपाकाची कामे 
 
नळदुर्ग जवळील ढाब्यावर मूकबधिर व्यक्तीला गुलामाची वागणूक

उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका  30 वर्षीय मूकबधिर विकलांग व्यक्तीला पायाला साखळदंड बांधून त्याच्याकडून कामे करून घेत असल्याचे समोर आले आहे. 

तुळजापूर -  नळदुर्ग रोडवर गंधोरा बूस्टर येथील तांबोळी धाब्यावर हा धक्कादायक आणि अमानवी प्रकार घडला आहे. मधुकर नामक विकलांग, मूकबधिर व्यक्तीकडून स्वयंपाकाची कामे करून घेतली जात होती. तो काम सोडून कुठेही जावू  नये म्हणून त्याच्या पायाला नेहमीच साखळदंड बांधून गुलामाची वागणूक दिली जात होती. 

नळदुर्ग पोलिसांना माहिती मिळताच या धाब्यावर कारवाई करण्यात आली असून ढाबाचालक अमीर तांबोळी यास अटक करण्यात आली आहे.  मूकबधिर मधुकरचीही  सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी ढाबा चालक अमीर तांबोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

From around the web