रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात टिप्पर घुसला

पती-पत्नी ठार, तीन गंभीर जखमी 
 
रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात टिप्पर घुसला

ढोकी -  मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात भरधाव वेगाने जाणारा टिप्पर( डंपर) घुसून पलटी झाल्याने दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री ११  वाजता ही  दुघर्टना घडली असून, जखमींना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

ढोकी - मुरुड रस्त्याच्या कडेला  प्रकाश सुरवसे यांचे कडेला पत्र्याचे  घर आहे. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास रस्त्यावरून वाहतूक सुरु असताना, अचानक भरधाव जाणारा टिप्पर (डंपर ) या घरात घुसून प्रकाश बाबुराव सुरवसे ( वय ५५ ) आणि त्यांच्या पत्नी  मुजुरूकाबाई सुरवसे ( वय ५० ) हे पती - पत्नी जागीच मरण पावले तर गणपत प्रकाश सुरवसे ( वय ३० ) आकाश गणपत सुरवसे ( वय ४), अक्षरा प्रल्हाद सुरवसे ( वय १० )  गंभीर जखमी झाले. जखमींना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर भीषण अपघात झाल्याने  ढोकी गावावर शोककळा पसरली आहे. 


पोलिसात गुन्हा दाखल 

डंपर क्र. एम.एच. 25 एजे 1353 च्या अज्ञात चालकाने दि. 10.11.2020 रोजी 22.30 वा. सु. ढोकी- लातुर रस्त्याने डंपर निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होउन ढोकी पेट्रोल पंप चौकापासून लातूर रस्त्यावर अंदाजे 700 फूट अंतराव रस्त्याच्या बाजूस असलेल्या प्रकाश सुरवसे यांच्या पत्रा शेडमध्ये घुसला. या अपघातात शेडमधील 1)प्रकाश बाबुराव सुरवसे, वय 60 पर्षे 2)मुद्रीका प्रकाश सुरवसे, वय 50 वर्षे, दोघे रा. ढोकी हे दोघे मयत झाले तर 3)पल्लीवी सुरवसे 4)नंदीणी सुरवसे 5)अक्षरा सुरवसे 6)आकाश सुरवसे 7)श्लोक सुरवसे 8)श्रध्दा सुरवसे 9)प्रताप पवार 10)लाला पवार, सर्व रा. ढोकी 11)गणेश शिंदे, रा. बुकनवाडी हे सर्वजण किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले. यावरुन ढोकी पो.ठा. चे पोकॉ- भगवान मंदमुले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधी डंपर चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 304, 338, 337, 279 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब), 132/179, 50/177 अन्वये काल दि. 11.11.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

आ. राणा जगजितसिंह पाटील यांची घटनास्थळास भेट 

भाजपचे आमदार आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी ढोकी येथील घटनास्थळास भेट देवून दुर्घटनेची माहिती घेतली तसेच रुग्णालयात जावून  जखमींची विचारपूस केली 

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन अपघात 

मुरुम: चालक- भिमसेन लक्ष्मण जमादार, रा. खंडाळ, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक यांनी ट्रॅक्टर क्र. के.ए. 2020 टीआर 5851 हा दि. 07.11.2020 रोजी 19.30 वा. सु. केसरजवळगा येथील शेतात निष्काळजीपणे मागे घेत असतांना ट्रॅक्टरच्या पाठीमागे उभे सलेले अरुण रामचंद्र लुल, रा. केसरजवळगा, ता. उमरगा यांना ट्रॅक्टरच्या नागराचा फाळ डोक्यात लागून ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या अर्चना अरुण लुल (मयताची पत्नी) यांनी काल दि. 10.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  जोत्सना झोंबाडे, रा. शिवनेरी नगर, उस्मानाबाद या दि. 03.11.2020 रोजी 16.30 वा. सु. राहत्या गल्लीतून शेळ्या घेउन जात होत्या. यावेळी इनोव्हा कार क्र. एम.एच. 20 जीके 6262 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून एका शेळीस धडक दिल्याने ती जागीच मरण पावली. यामुळे जोत्सना झोंबाडे यांचे 6,000/-रु. चे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या जोत्सना झोंबाडे यांनी काल दि. 10.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 429 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web