आघाडी सरकार लवकरच कोसळणार - दानवे 

 
आघाडी सरकार लवकरच कोसळणार - दानवे

उस्मानाबाद - राज्यातील आघाडी सरकरमध्ये कसलाही ताळमेळ नसून, आपापसातील मतभेदामुळे हे सरकार लवकरच कोसळणार आहे,असे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले. 

मराठवाडा ( औरंगाबाद ) पदवीधर मतदारसंघ  निवडणुकीतील  भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ दानवे उस्मानाबादेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

मराठा आरक्षणासारखा गंभीर विषय या आघाडी सरकारला नीट हाताळला नाही. हे सरकारचे अपयश आहे. अतिवृष्टीग्रस्त  शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याऐवजी तोकडी मदत केली. वीज बिल माफ करतो म्हणून  आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. हे सरकार एकही आश्वासन पाळू शकले नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यात एकमेकांवर विश्वास नसल्याने हे सरकार कधीही कोसळू शकते, असेही दानवे यांनी सांगितले. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल दानवे म्हणाले ,आपले हात बरबटले नसले तर ईडीला का घाबरता ? आमच्यावरही ईडीच्या कारवाया झाल्या आहेत, असे सांगून सीडीची  कश्याला आठवण काढता  असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ खडसे यांना  मारला. 


मी केंद्रात खुश आहे. महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यास मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. 

From around the web