टाकळी बेंबळी येथे गोळीबार 

पाच वर्षांपूर्वी मोटारसायकल विकली, त्याचे पैसे मागितले म्हणून जमिनीवर फायर केल्याने छर्रे उडून दोन जखमी 
 
टाकळी बेंबळी येथे गोळीबार

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी  बेंबळी येथे महाराष्ट्र दिनी एक खळबळजनक घटना घडली आहे. पाच  वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या मोटारसायकलचे पैसे  का मागितले ? या कारणावरून  रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार  करण्यात आल्याने  दोनजण जखमी झाले असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

आज दिनांक १ मे  रोजी पाच वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास मौजे टाकळी {बेंबळी} येथे दिपक धनाजी जगताप याने त्याच्याकडील  रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर केल्याने दोन इसम किरकोळ जखमी झाले आहेत. 

टाकळी  बेंबळी येथील अनिल राम सूर्यवंशी आणि  दीपक जगताप हे  एकमेकांच्या  ओळखीचे आहेत. दीपक जगताप याने अनिल सूर्यवंशी याची पाच वर्षांपूर्वी मोटारसायकल विकली होती, त्या पैश्याच्या वादातून दोघात आज महाराष्ट्र दिनी वाद झाला आणि या वादातून गोळीबार झाला आहे. 

अशी घडली घटना 

दिपक धनाजी जगताप (सध्या स्थायिक पुणे) हा लाँकडाऊनमध्ये त्याच्या  तीन मित्रासोबत टाकळी येथे आला होता. टाकळी येथील अनिल सूर्यवंशी नावाच्या इसमाकडून त्याने पाच वर्षांपूर्वी डिस्कवर मोटरसायकल विकत घेतली होती. सदर डिस्कवरचे पैसे  सूर्यवंशी  मागत होता.त्याचा राग मनात धरून पाच  वाजण्याच्या सुमारास समाज मंदिर येथे सूर्यवंशी व अन्य दोन इसम गप्पा मारत बसले असता दिपक धनाजी जगताप यांनी तेथे येऊन त्याच्या कडील  रिव्हॉल्व्हरने जमिनीवर फायर केल्याने त्याचे छर्रे उडून ते सूर्यवंशी यांच्यासोबतच्या दोन इसमांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. 


त्यानंतर  सदरचे चारही इसम दोन मोटारसायकलवरून उस्मानाबादच्या दिशेने निघून गेलेले आहेत. सदर बाबत नियंत्रण कक्षाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.सदर घटनेतील दीपक धनाजी जगताप याने  काळ्या रंगाचे जॅकेट घातले असून काळा गॉगल लावलेला आहे. तसेच अन्य तीन पैकी एकाने पिवळ्या रंगाचा टि-शर्ट व एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्यांनी पळून जाण्यासाठी दोन मोटारसायकली वापरल्या असून एक काळया रंगाची पल्सर व एक स्कूटर आहे.

घटनेची माहिती मिळताच,बेंबळी  पोलीस स्टेशनचे पोलीस टाकळी  बेंबळी येथे दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा सुरु आहे. 

बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

टाकळी (बें.), ता. उस्मानाबाद येथील अनिल राम सुर्यवंशी यांची मोटारसायकल गावकरी- दिपक धनाजी जगताप यांनी 5 वर्षांपुर्वी उधारीत विकत घेतली होती. ते पैसे परत करण्यास अनिल सुर्यवंशी यांनी दिपक जगताप यांच्याकडे तगादा लावला होता. अनिल सुर्यवंशी हे गावकरी- राजदिप व सचिन जगताप यांसह दि. 01.05.2021 रोजी 16.30 वा. सु. गावातील समाजमंदीरात बसले होते. यावेळी दिपक जगताप यांसह तीन अनोळखी व्यक्ती दोन मोटारसायकलवर तेथे आले. अनिल सुर्यवंशी हे मोटारसायकलचे पैसे मागत असल्याचा वाद उकरुन काढून दिपक जगताप यांनी अनिल सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले असता दिपक सोबतच्या तीन अनोळखी व्यक्तींनी दिपक यांना चिथावणी दिली. दरम्यान अनिल सुर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखुन दिपक यांच्या हाताला झटका दिल्याने पिस्तुलातील काडतूस जमीनीवर झाडले जाउन त्यातील छर्रे राजदिप व सचिन जगताप यांना लागून ते दोघे गंभीर जखमी झाले. झाडलेले रिकामे काडतुस बाजूला पडले असता दिपक जगताप याने उचलून घेतले व त्यानंतर सहकाऱ्यांसह त्याने घटनास्थळावरुन मोटारसायकलसह पलायन केले.

            अशा मजकुराच्या अनिल सुर्यवंशी यांनी दि. 02.05.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326, 323, 107, 201, 504, 506, 34 सह शस्त्र अधिनियम कलम- 3, 25, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web